शनिवार, २० जून, २०१५

विश्वव्यापी योगामृत : आंतरराष्ट्रीय योगदिन, त्यानिमित्त..

   विश्वव्यापी योगामृत : आंतरराष्ट्रीय योगदिन, त्यानिमित्त..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिन साजरा व्हावा म्हणून संयुक्त राष्ट्र संघाकडे आग्रह धरून, योगाचे महत्त्व आणि माहात्म्य पटवून देऊन अखेर संपूर्ण विश्वाला योगामृताची देणगी तमाम भारतवासियांतर्फे वरदान म्हणून दिली. संयुक्त राष्ट्रसंघानेही मानवी आरोग्याशी निगडित असलेल्या योगाला अखेर एक दिवस दिला. आंतरराष्ट्रीय स्तरावर 21 जून हा योग दिन ठरविण्यात आला. भारतीय  संस्कृतीला ऋषिमुनींची मोठी परंपरा आहे. योगाच्या बाबतीत तर याची जन्मभूमी म्हणून भारताकडे पाहिले जाते. या योग दिनी भारतासह संपूर्ण जगभरातील शाळा-महाविद्यालातून योगाचे महत्त्व, उपक्रम व प्रत्यक्षिकातून सांगण्यात येणार आहे.

तुमचा भाग्य अंक - तुमचे आरोग्य भाग-8



Image result for 7
तुमचा भाग्य अंक - तुमचे आरोग्य भाग-8

भाग्य अंक 7
https://fbcdn-sphotos-c-a.akamaihd.net/hphotos-ak-xaf1/v/t1.0-9/11032390_1565232300397114_2344977045996052992_n.jpg?oh=5355fc437ca14cbab093f6803a2f407e&oe=55AD8049&__gda__=1433826814_e439c2b72922498b81543fb7f1ec844d
सात अंकाच्या म्हणजे 7,16 व 25 या तारखा पैकी कोणत्याही तारखेला जन्मास आलेल्या व्यक्तींना खालील व्याधी होतात.

असा वसला महाराष्ट्र! महाराष्ट्राचा आदिम इतिहास भाग - 7


chief.jpg

याचाही संबंध त्यांच्या कुठल्या समजुतीशी असावा असा अभ्यासकांचा कयास आहे.
अग्निपूजेचाही एक पुरावा मिळतो दायमाबादमधे. तिथे काही खड्ड्याच्या स्वरूपातली अग्निकुंडे मिळाली आहेत. आणी त्यात जळालेली गाई-बैलांची हाडे व धान्याचे दाणे सापडले आहेत.
हे लोक मातृसत्ताक होते की पितृसत्ताक हे समजायला मार्ग नाही, पण ज्याला मानववंशशास्त्रात tribal म्हणतात तसे होते. म्हणजे कुटुंब आणि कुल (clan) यांच्या सामाजिक चौकटीतच वावरणारे. उपलब्ध पुराव्यावरून तरी यांच्यात सामाजिक विषमता होती, वर्गभेद होता असं दिसत नाही. शहरीकरणाच्या आधीच्या या संस्कृतीत राज्यसंस्था, राजेपद असंही काही असावं असं दिसत नाही. गावाचा कारभार गावप्रमुख पहायचा. त्याचा दर्जा साहजिकच इतरांपेक्षा थोडा वरचा किंवा वेगळा. इनामगावच्या उत्खननात मिळालेलं गावप्रमुखाचं घर ४-५ खोल्यांचं होतं पण याशिवाय त्या घरातून इतरांपेक्षा वेगळी अशी कुठलीच वस्तू मिळाली नाही. फरक होता तो दफनांमधे. या घरातून मिळालेली दोन पुरुषांची (बहुदा लागोपाठच्या पिढ्यांमधली) दफने ही इतरांसारखी खड्ड्यात झोपवून नव्हे तर ४ पायांच्या साठवणीच्या रांजणाचा वापर खुर्चीसारखा करून त्यात मृतदेहाला मांडी घालून बसवून केली होती. शिवाय या मृतदेहांचे पाय कापण्यात आले नव्हते! आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गावचं धान्यकोठार या घराच्या मागच्याच बाजूला होतं. बहुदा त्याची देखरेख आणि नियंत्रण हा गावचा प्रमुख करत असावा. (या अशा सामाजिक रचनेला इंग्लिश्मधे chiefdom असं म्हणतात).