शनिवार, ७ डिसेंबर, २०१३

रविवार ८, डिसेंबर २०१३

शिवथरघळ


आध्यात्माचा स्पर्श....हे सारं अनुभवायचे असेल तर शिवथरघळीसारखे सुंदर ठिकाण नाही. समर्थांनीही ज्याचे वर्णन विश्रांती वाटते येथे ,जावया पुण्य पाहिजे , अशा शब्दात केलेले आहे त्याची अनुभुती येथे आल्याशिवाय मिळत नाही.पूर्ण वाचा ....

_______________________________________________________________________________


थंडीत त्वचेची काळजी घ्या!


चेह-यापेक्षाही हातापायाचे हाल थंडीत फारच होतात. टाचा, गुडघे, कोपरे, घोटे हे इतर वेळी कोरडे असणारे शरीराचे भाग शरीरातील पाण्याच्या अभावाने अधिकच काळे पडतात. त्यांना भेगा

पडतात. आपण त्याला क्रीम व तेल लावून मऊ ठेवण्याचा प्रयत्न करतो; पण त्यापेक्षाही शरीरातील पाणी टिकवून ठेवणा-या क्षाराचा विचार या ऋतूमध्ये होणे आवश्यक आहे. हे काळे पडलेले अवयव मळले आहेत म्हणून परत परत साबणाने धुण्याचा वेडेपणा ब-याच जणी करतात; पण त्यामुळे उलट त्वचा अधिकच कोरडी पडून शुष्क होते. अशा वेळी जर दुपारी उन्हात जाण्याची वेळ येत असेल तर हाताच्या बाहेरच्या बाजूला पिग्मेंटेशन होऊन हाताचा बाहेरचा भागही काळा पडतो व तो जवळजवळ कायमचा राहतो. त्यामुळे थंडीचा ऋतू हा त्वचेची, शरीराची उत्तम काळजी घेण्यामध्ये घालवावा. चेह-यासाठी क्लिन्सिंग - स्वच्छता, टोनिंग-संरक्षण व नरिशिंग - संवर्धन हा सौदर्याचा गुरुमंत्र कायमचा लक्षात ठेवा. चेहरा, हात, पाय, शरीर या प्रत्येकाच्या सौंदर्यासाठी हाच गुरुमंत्र आहे.
 थंडीत त्वचेची काळजी कशी घ्याल? पूर्ण वाचा 
_______________________________________________________________________________

 मेथीचे ठेपले

 
साहित्य

चिरलेली मेथी- १ वाटी गव्हाचे पीठ- ३ वाट्या  आले लसूण आणि मिर्ची पेस्ट -३ चमचे  धणे पुड-२ चमचे जीरे पुड-३ चमचे हळद-१ चमचा  तिखट- १ चमचा  एक मध्यम लिम्बाचा रस  साखर-१ चमचा मीठ-चवीप्रमाणे  तेल-अर्धी वाटी .
_______________________________________________________________________________

 कविता
अल्याडच्या  डोंगरात 
काळे मेघ उतरले
इथे तिथे साद घुमे
                                                                   दिस पावसाचे आले !पूर्ण वाचा 

__________________________________________________________________________


उंच उंच गगन चुंबी त्या इमारती
का आम्हास राहण्यास झोपडी खुजी !
बसण्यासाठी  तुम्हास गाडी आलिशान
का पायी चालुनी आम्ही तुडवावी घान !
                                                    अंगात कपडे तुमच्या  उंची महागडे  पूर्ण वाचा 
__________________________________________________________________________






बुधवार, ४ डिसेंबर, २०१३

गुरुवार ५, डिसेंबर २०१३

महाराष्ट्राचाइतिहास व मराठीची उत्पत्ती- भाग-2


निरनिराळ्या काळातल्या ग्रंथकारांनी दक्षिणापथाची मर्यादा ही अशी सांगितली आहे. उत्तरमर्यादा नर्मदा आणि दक्षिणमर्यादा मात्र अनिश्चित अशी दक्षिणापथाची स्थिती होती. कधी कधी महाराष्ट्र दक्षिणापथ ही दोन्ही नावं एकाच प्रदेशास अनुलक्षून स्थूल अर्थानं वापरलेली दिसतात. या दक्षिणेकडील प्रदेशाची आर्यांना फारशी माहिती नव्हती. त्यांच्या परिचयाचे प्रदेश म्हणजे आर्यावर्त आणि मध्यप्रदेश. तिथेच त्यांचं मांत्रिक पठण, यज्ञकर्मं वगैरे चालत असे. या देशाच्या पलीकडे कोणी आर्य गेलेच तर व्रात्य म्हणून पतित होत आणि पुन्हा आर्यांच्या समाजात सामावून घेण्यासाठी त्यांना व्रात्यस्तोमासारखे विधीही करावे लागत. आर्यावर्ताच्या बाहेर जाण्यासंबंधी असे सक्त निर्बंध असल्यामुळे सामान्य जनतेचा चौफेर संचार नव्हता. दक्षिणेकडे जायचं म्हणजे वनवासात जायचं असा प्राचीन काळी समज होता. या धार्मिक निर्बंधांबरोबरच निसर्गही फारसा अनुकूल नसल्यानं दक्षिणप्रांत आर्यांच्या ताब्यात येण्यासाठी उत्तरेकडील प्रदेशापेक्षा जास्त वेळ लागला. विंध्य, पुढे सातपुडा, दोन्ही बाजूंस सह्याद्रीच्या डोंगराळ खबदाडी. असा खडतर प्रवास उत्तरेकडील संपन्न व समृद्ध प्रांतांत सुखावलेले आर्य का ओढवून घेतील? म्हणूनच पुष्कळ काळ दक्षिणेकडील प्रांत आर्यांच्या दृष्टीने दंडकारण्यच राहिलासी पूर्ण वाचा.... 
_______________________________________________________________________________
 विजय पांडुरंग भटकर हे मूळचे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील मुरंबा (ग्राहकहित-'अंबाला' ) या अडीचशे-तीनशे लोकवस्तीच्या गावाचे. जन्म ११ ऑक्टोबर १९४६. त्यांचे मूळ घर जनावरांचा गोठा आणि पडक्या भिंती असलेल्या जुनाट वाड्यात. त्यांनी आपले इलेक्ट्रिकल इंजिनीरिंगचे आणि पीएच.डीपर्यंतचे शिक्षण मुरंबा, करजागाव, मूर्तिजापूर, अमरावती, नागपूर, वडोदरा आणि दिल्ली अशा अनेक ठिकाणी फिरून पूर्ण केले. भटकरांनी शिक्षणाच्या काळात सर्व विषयांतील साधारणत: पन्नास हजार पुस्तके वाचली, असेम्हणतात. शिक्षणानंतर, त्यांना परदेशी नोकऱ्यांची अनेक आमंत्रणे होती, पण त्यांनी भारतातच राहायचे ठरवले होते.
भारताने अमेरिकेने संगणकविक्रीसाठी घातलेल्या अटी नाकारून डॉ.भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपला स्वत:चा महासंगणक बनवण्याचे ठरवले. हवामानाच्या अंदाजातील अचूकता वाढवण्यासाठी महासंगणक ही भारताची मोठी गरज होती. पूर्ण वाचा.....
_______________________________________________________________________________
                                             कविता

 नाते

बिज धरतीवर पडले
नाते मातीशी जुलाल
बीजाशी चढला जोम
उगवला मातीतून कोम
 
 
_______________________________________________________________________________
 
 
 
रात्र थोडी
सोंगे फार
जास्त झाली
ढोंगे भार !

मंगळवार, ३ डिसेंबर, २०१३

बुधवार ४, डिसेंबर २०१३

बुधवार ४, डिसेंबर २०१३ सुविचार : यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला..

 

सुंदर दिसण्यासाठ सोपे घरगुती उपाय!
त्वचा ही व्यक्तिच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग आहे. सतेज त्वचा पटकन लोकांचे लक्ष आकर्षित करून घेण्यासाठी कारणीभूत ठरते. त्वचेतील ओलावा टिकून राहण्यासाठी, त्वचेला योग्यरित्या पोषण मिळवून देणे हा सर्वोत्तम उपाय आहे. त्वजेतील तेजस्वीपणा टिकवूण ठेवण्यासाठी, आरोग्यदायी अन्न सोडू नका. आरोग्य आणि सौंदर्य क्षेत्रातील उपभोक्ता उत्पादन आणि सेवा प्रदान करणाऱ्या एका कंपनीच्या त्वचा विशेषतज्ज्ञांनी त्वचेला कांतिमय बनविण्यासाठी काही अशाच टिप्स दिल्या आहेत ...वाचा....
_______________________________________________________________________________
http://mhavaibhav5.blogspot.in/2013/12/blog-post_4101.html
 शेतकऱ्याला फटके
चोरांचा सत्कार आहे
सत्तेवर बसलेल्या
सापांचा फुत्कार आहे ....वाचा ....
  

_______________________________________________________________________________
 
यशासाठी घ्या राईट टर्न
  कधी कधी उत्तर शोधायचा घाईने प्रश्न आणखी बिकट होत जातात. गेल्या दहा वर्षात सतत टीव्हीवरच्या ब्रेकिंग न्यूज बघायच्या सवयीमुळे कदाचित आपल्यालासुद्धा घाईने उत्तर शोधण्याची सवय लागलेली आहे. मी तर म्हणेन की ब्रेकिंग उत्तरापेक्षा घ्या एक छानसा ब्रेक! प्रत्येक प्रश्न हा त्याच दिवशी सोडवला पाहिजे हा नियम बनवू नका, आणि ये दिन भी जायेंगेअसे म्हणत वस्तुनिष्ठपणे परिस्थितीचा शांतपणे विचार करा. प्रश्नाच्या उत्तरापेक्षा आपल्याला या गर्तेतून कुठल्याही परिस्थितीत बाहेर पडायचंय आहे अशी मनाशी खूणगाठ मारणं गरजेचे आहे. आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना (गरज वाटल्यास कुटुंबियांनासुद्धा) विश्वासात घ्या आणि प्रत्येकाला त्याचे स्वतंत्र विचार निर्भिडपणे मांडूद्या, कुठलाही किंतु न ठेवता त्यांच्याशी चर्चा करायला हरकत आहे. उत्तर कुठून वा कोणाकडून मिळाले यापेक्षा उत्तर मिळणे हे महत्त्वाचे आहे. जमल्यास एखाद्या त्रयस्थ माणसांबरोबर प्रश्नासंबंधी चर्चा करायचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारे जेव्हा आपण आपले प्रश्न नव्याने मांडत जाता तेव्हा आपल्याच नकळतपणे त्याचे उत्तर सापडत जातं. .....वाचा.....
_______________________________________________________________________________