शनिवार, २० जून, २०१५

विश्वव्यापी योगामृत : आंतरराष्ट्रीय योगदिन, त्यानिमित्त..

   विश्वव्यापी योगामृत : आंतरराष्ट्रीय योगदिन, त्यानिमित्त..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिन साजरा व्हावा म्हणून संयुक्त राष्ट्र संघाकडे आग्रह धरून, योगाचे महत्त्व आणि माहात्म्य पटवून देऊन अखेर संपूर्ण विश्वाला योगामृताची देणगी तमाम भारतवासियांतर्फे वरदान म्हणून दिली. संयुक्त राष्ट्रसंघानेही मानवी आरोग्याशी निगडित असलेल्या योगाला अखेर एक दिवस दिला. आंतरराष्ट्रीय स्तरावर 21 जून हा योग दिन ठरविण्यात आला. भारतीय  संस्कृतीला ऋषिमुनींची मोठी परंपरा आहे. योगाच्या बाबतीत तर याची जन्मभूमी म्हणून भारताकडे पाहिले जाते. या योग दिनी भारतासह संपूर्ण जगभरातील शाळा-महाविद्यालातून योगाचे महत्त्व, उपक्रम व प्रत्यक्षिकातून सांगण्यात येणार आहे.

असा वसला महाराष्ट्र! महाराष्ट्राचा आदिम इतिहास भाग - 7


chief.jpg

याचाही संबंध त्यांच्या कुठल्या समजुतीशी असावा असा अभ्यासकांचा कयास आहे.
अग्निपूजेचाही एक पुरावा मिळतो दायमाबादमधे. तिथे काही खड्ड्याच्या स्वरूपातली अग्निकुंडे मिळाली आहेत. आणी त्यात जळालेली गाई-बैलांची हाडे व धान्याचे दाणे सापडले आहेत.
हे लोक मातृसत्ताक होते की पितृसत्ताक हे समजायला मार्ग नाही, पण ज्याला मानववंशशास्त्रात tribal म्हणतात तसे होते. म्हणजे कुटुंब आणि कुल (clan) यांच्या सामाजिक चौकटीतच वावरणारे. उपलब्ध पुराव्यावरून तरी यांच्यात सामाजिक विषमता होती, वर्गभेद होता असं दिसत नाही. शहरीकरणाच्या आधीच्या या संस्कृतीत राज्यसंस्था, राजेपद असंही काही असावं असं दिसत नाही. गावाचा कारभार गावप्रमुख पहायचा. त्याचा दर्जा साहजिकच इतरांपेक्षा थोडा वरचा किंवा वेगळा. इनामगावच्या उत्खननात मिळालेलं गावप्रमुखाचं घर ४-५ खोल्यांचं होतं पण याशिवाय त्या घरातून इतरांपेक्षा वेगळी अशी कुठलीच वस्तू मिळाली नाही. फरक होता तो दफनांमधे. या घरातून मिळालेली दोन पुरुषांची (बहुदा लागोपाठच्या पिढ्यांमधली) दफने ही इतरांसारखी खड्ड्यात झोपवून नव्हे तर ४ पायांच्या साठवणीच्या रांजणाचा वापर खुर्चीसारखा करून त्यात मृतदेहाला मांडी घालून बसवून केली होती. शिवाय या मृतदेहांचे पाय कापण्यात आले नव्हते! आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गावचं धान्यकोठार या घराच्या मागच्याच बाजूला होतं. बहुदा त्याची देखरेख आणि नियंत्रण हा गावचा प्रमुख करत असावा. (या अशा सामाजिक रचनेला इंग्लिश्मधे chiefdom असं म्हणतात). 

महाराष्ट्राचा इतिहास व मराठीची उत्पत्ती- भाग-8


एक मत असं आहे की, वेदसमकालीन ज्या बोली होत्या त्यांपासून मराठी निर्माण झाली, व याला आधार म्हणजे वेदांमध्ये संस्कृत भाषेच्या स्वभावाशी विसंगत व प्राकृत भाषांच्या स्वभावाशी जुळणारे जे विशेष सापडतात ते होत. वैदिक संस्कृतातले काही शब्द मराठीत, विशेषत: ग्रामीण मराठीत आजही वापरले जातात. उदाहरणार्थ, त्यो हे सर्वनाम. संस्कृतात या शब्दनामाचा छडा लागत नाही. पण मराठीत मात्र हा शब्द अजूनही ऐकू येतो. परंतु या तुटपुंज्या पुराव्यावर मराठी भाषा त्या भाषांपासून निर्माण झाली असं म्हणता येणार नाही. शिवाय भाषेला शिष्ट व अशिष्ट, किंवा नागर व ग्रामीण किंवा ग्रांथिक व बोली अशी रूपं असतात. त्यांपैकी वेदकालीन भाषेतही अशी रूपं असतीलच. त्यामुळे तत्कालीन बोलीतील काही अवशेष आज मराठीत सापडतही असतील. परंतु त्यावरून मराठीचं जनकत्व वेदकालीन बोलींना आपण बहाल करू शकत नाही.
दुसरा एक पक्ष मराठीची जननी संस्कृत भाषा ही आहे, असं मानतो. फक्त वरवर जरी पाहिलं तरी संस्कृत ही मराठीची जननी ठरत नाही. वर्णाचे बदल, प्रयोगाची भिन्नता, उच्चारांत फरक स्पष्ट आहेत. मराठी आणि संस्कृत या दोन्हींत नातं आहेच. या दोन्ही भाषांत पुष्कळ अंतर्वर्ती अशा अवस्था या प्राकृत भाषा आहेत. भाषेच्या एकंदर वाढीच्या दृष्टीनं अशा अवस्था उत्पन्न होणं अपरिहार्य आहे. तेव्हा संस्कृत भाषेला मराठीची जननी म्हणणं अशास्त्रीय ठरतं. हाच युक्तिवाद प्राकृत भाषांबद्दलही करता येईल. 
marathi.jpg 
 

बुधवार, २७ मे, २०१५

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निम्मित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन...

स्वातंत्र्यवीर सावरकर


https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj6ym4OHMfjApiNfEs6oKyrcwnDNbwpieXTprY-HlP7xFTJa__Eg97IAHhFrs7iSOXA8QuvsVpIqLVVIGFVjEYHV5sgoaVVnG_SCpEnwgPE6DG7Kxd5YTiw-cVh5GPN7Ef0D-Y58gDuTZnL/s1600/savarkar_3.jpg
वि. दा. सावरकर


 स्वातंत्र्यसैनिकांचे अग्रणी, हिंदू राष्ट्रवादाचे तत्त्वज्ञ व हिंदू संघटक, धर्मसुधारक व समाजसुधारक, महाकवी आणि विज्ञाननिष्ठा व राष्ट्राची शस्त्रसज्जता यांबाबत प्रखर विचार मांडणारे वि. दा. सावरकर यांची आज जयंती. त्या निमित्त..
२४ ते ३० मे २०१५
 स्वातंत्र्यवीर सावरकर

     स्वातंत्र्यवीर सावरकर लेख वाचण्यासाठी  घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइडवर.......   

कामात यश मिळवण्यासाठी बाहेर पडताना करा हे 3 उपाय


ganesh
1. कोणत्याही मंगलकार्यासाठी घरातून बाहेर पडताना 'श्री गणेशाय नम:' असे मंत्र म्हणून विपरित दिशेत 4 पावलं जाऊन मग आपल्या कामासाठी निघून जावे, कार्य निश्चित पार पडेल.

   कामात यश मिळवण्यासाठी बाहेर पडताना करा हे 3 उपाय जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइडवर.......   

२४ ते ३० मे २०१५

कामात यश मिळवण्यासाठी बाहेर पडताना करा हे 3 उपाय


मंगळवार, २६ मे, २०१५

राशीनुसार जाणून घ्या, तुमच्यासाठी बुधवार चांगला आहे की नाही

बुधवारी चंद्र अर्ध्या दिवसानंतर रास बदलत आहे. बुधवारी चंद्र सकाळी सिंह राशीत राहील. दुपारी जवळपास 3 वाजल्यानंतर कन्या राशीत प्रवेश करेल. सिंह राशीतील चंद्र तर शुभ फळ देतो परंतु कन्या राशीमध्ये चंद्र असल्यामुळे ग्रहण योग तयार होईल. चंद्र आणि राहू एकत्र आल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण होते. अचानक नुकसान होऊ शकते.

बुधवारी उत्तराफाल्गुनी नक्षत्र असल्यामुळे प्रवर्ध नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा योग दिवसभर राहील. सर्व राशींवर या योगाचा प्रभाव राहील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील....
२४ ते ३० मे २०१५

राशीनुसार जाणून घ्या, तुमच्यासाठी बुधवार चांगला आहे की नाही

सोमवार, २५ मे, २०१५

स्कीन टॅन झालीय, डोंट वरी!


प्लॅन केल्याप्रमाणे उन्हाळ्यातील सगळी मौजमजा, घुमनाफिरना झालं असेल नाही का? आणि आ‍ता तिकडून परत आल्यानंतर तिकडच्या मजा मस्तीचे फोटो पाहताना लक्षात येतं, अरे, आपण चांगलेच काळवंडलोय. उन्हात मनसोक्त भटकताना, पाण्यात खेळताना त्वचेकडे आपलं लक्षच गेलेलं नाहीय. स्कीन टॅन झालीय, पण डोंट वरी. तुमच्यासाठीच या काही खास टॅनिंग टिप्स. 

     टॅनिंग टिप्स जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइडवर.......   

२४ ते ३० मे २०१५
 स्कीन टॅन झालीय, डोंट वरी!