सोमवार, १६ डिसेंबर, २०१३

सोमवार १६ डिसेंबर २०१३

महाराष्ट्राचा इतिहास व मराठीची उत्पत्ती

कोकणाचा व इतर बाह्य प्रांतांचा व्यापाराच्या दृष्टीनं संबंध फार पुरातन काळचा आहे. इतर देशाचे व्यापारी हिंदुस्थानाशी जो व्यापार करत तो कोकणातूनच होत असे. पुष्कळ अरबी शब्द जे दक्षिणेकडील भाषांत सापडतात, ते याच काळात आले असावेत. इसवी सनापूर्वी चार शतकांपूर्वीपासून हा व्यापार चालत असावा. सह्याद्रीच्या पलीकडे असलेलं दंडकारण्य मात्र या देवघेवीपासून अलिप्त होतं. कोकणातील पुष्कळ बंदरांचा उल्लेख जुन्या लेखांमध्ये सापडतो. टोलेमी (इ. स. १५०) याच्या Geographia या भूगोलविषयक ग्रंथात सिमुल्ल (Simulla) किंवा तिमुल्ल (Timula) असा जो उल्लेख येतो, किंवा त्याही पूर्वी प्लिनीने (इ.स. २००) पेरिमल (Perimula) असा जो उल्लेख केला आहे, किंवा कान्हेरीच्या शिलालेखांत (इ. स. २००) चेमुल्ल म्हणून जे बंदर उल्लेखलेलं आहे, ते कोकणातलं चेऊल किंवा चोल होय. याशिवाय पाल, कोल, कुड, राजपुरी, घोडेगाव या गावांचाही उल्लेख आहे. उत्तरेकडचं शूर्पारक (सोपारा) हे तर मौर्यांच्या राजवटीत एक स्तूप तिथे उभारण्याइतकं महत्त्वाचं होतं. या बंदरांतून माल आत थेट नाशिक - पैठणपर्यंत पोहोचवला जात असे. काही यवन लोक बौद्धधर्म स्वीकारून कोंकणात वस्ती करून होते, असं दिसतं. कारण कान्हेरी, नाशिक, कार्ले, जुन्नर इथल्या विहारांना त्यांनी मोठ्या प्रमाणात देणग्या दिल्या होत्या. पूर्ण वाचा....

माझी माय 
माय मपली गाय .. अन मी तिचं वासरू ....
खोपटात सांभाळी मले.. जणू एखाद पाखरू ...
दारिद्र्याच्या जाळात ... मपली माय रोजच जळे ..
पाहून मह्याकड .. मायच्या डोळ्यातून अश्रू रोजच गळे ....
अशी माझी माय ....
उपाशी पोटानच तिने मले दुध पाजलं ....
रगत म्हणजे काय असत ....? हे मी तेंव्हाच चाखलं ....
घेऊन कडेवर शेतात ती मले नेत होती .....
झाडाला झोळी बांधून मले त्यात टाकत होती ...
उन्हातान्हात घाम गाळून ती दिसभर राबत होती ...
खरतर ....
   पूर्ण वाचा....

@    लेखक/ कवी    सागर वानखेडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Add