शनिवार, ७ डिसेंबर, २०१३

रविवार ८, डिसेंबर २०१३

शिवथरघळ


आध्यात्माचा स्पर्श....हे सारं अनुभवायचे असेल तर शिवथरघळीसारखे सुंदर ठिकाण नाही. समर्थांनीही ज्याचे वर्णन विश्रांती वाटते येथे ,जावया पुण्य पाहिजे , अशा शब्दात केलेले आहे त्याची अनुभुती येथे आल्याशिवाय मिळत नाही.पूर्ण वाचा ....

_______________________________________________________________________________


थंडीत त्वचेची काळजी घ्या!


चेह-यापेक्षाही हातापायाचे हाल थंडीत फारच होतात. टाचा, गुडघे, कोपरे, घोटे हे इतर वेळी कोरडे असणारे शरीराचे भाग शरीरातील पाण्याच्या अभावाने अधिकच काळे पडतात. त्यांना भेगा

पडतात. आपण त्याला क्रीम व तेल लावून मऊ ठेवण्याचा प्रयत्न करतो; पण त्यापेक्षाही शरीरातील पाणी टिकवून ठेवणा-या क्षाराचा विचार या ऋतूमध्ये होणे आवश्यक आहे. हे काळे पडलेले अवयव मळले आहेत म्हणून परत परत साबणाने धुण्याचा वेडेपणा ब-याच जणी करतात; पण त्यामुळे उलट त्वचा अधिकच कोरडी पडून शुष्क होते. अशा वेळी जर दुपारी उन्हात जाण्याची वेळ येत असेल तर हाताच्या बाहेरच्या बाजूला पिग्मेंटेशन होऊन हाताचा बाहेरचा भागही काळा पडतो व तो जवळजवळ कायमचा राहतो. त्यामुळे थंडीचा ऋतू हा त्वचेची, शरीराची उत्तम काळजी घेण्यामध्ये घालवावा. चेह-यासाठी क्लिन्सिंग - स्वच्छता, टोनिंग-संरक्षण व नरिशिंग - संवर्धन हा सौदर्याचा गुरुमंत्र कायमचा लक्षात ठेवा. चेहरा, हात, पाय, शरीर या प्रत्येकाच्या सौंदर्यासाठी हाच गुरुमंत्र आहे.
 थंडीत त्वचेची काळजी कशी घ्याल? पूर्ण वाचा 
_______________________________________________________________________________

 मेथीचे ठेपले

 
साहित्य

चिरलेली मेथी- १ वाटी गव्हाचे पीठ- ३ वाट्या  आले लसूण आणि मिर्ची पेस्ट -३ चमचे  धणे पुड-२ चमचे जीरे पुड-३ चमचे हळद-१ चमचा  तिखट- १ चमचा  एक मध्यम लिम्बाचा रस  साखर-१ चमचा मीठ-चवीप्रमाणे  तेल-अर्धी वाटी .
_______________________________________________________________________________

 कविता
अल्याडच्या  डोंगरात 
काळे मेघ उतरले
इथे तिथे साद घुमे
                                                                   दिस पावसाचे आले !पूर्ण वाचा 

__________________________________________________________________________


उंच उंच गगन चुंबी त्या इमारती
का आम्हास राहण्यास झोपडी खुजी !
बसण्यासाठी  तुम्हास गाडी आलिशान
का पायी चालुनी आम्ही तुडवावी घान !
                                                    अंगात कपडे तुमच्या  उंची महागडे  पूर्ण वाचा 
__________________________________________________________________________






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Add