महाराष्ट्र माझा :1 मे - महाराष्ट्र दिन
1 मे - महाराष्ट्र दिन
1 मे हा महाराष्ट्र राज्याचा
स्थापना दिन. याच दिवशी 1960 साली तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु
यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.
पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला आणि
नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली. तसा महाराष्ट्राचा
ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. राष्ट्रीय सभेच्या
स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या
प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन
संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही योगदान दिले आहे.
महाराष्ट्राचा धार्मिक सुधारणांचा, सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी
आहे. राज्याचे विविधांगी भावविश्व् थक्क करणारे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Add