असा साकारला संयुक्त महाराष्ट्र
स्वतंत्र भारतात मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभारली गेली. या चळवळीमुळे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य आस्तित्वात आले. महाराष्ट्रात मराठी भाषा बोलणारे मुंबई, कोकण, देश, विभर्द, मराठवाडा, खान्देश व अजूनही महाराष्ट्रबाहेरच असेलेले डांग, बेळगाव, निपाणी, कारवार व बिदर हे भाग अभिप्रोत होते. साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय या सर्व अंगांनी ही चळवळ उभी राहिली. ब्रिटीशांनी आपल्या राज्य कारभारासाठी भारताची विभागणी वेगवेगळ्या प्रांतात केली होती, परंतु ती भाषेप्रमाणे नव्हती. 1920 मध्ये नागपुरात झालेल्या काँग्रेस अधिवेशनावेळी भाषावार प्रांतरचनेचा मुद्दा महात्मा गांधी यांनी मान्य केला होत. लोकमान्य टिळक हे देखील भाषावार प्रांतरचनेच्या बाजूने होते. काँग्रेसनेच एकेकाळी मान्य केलेला हा मुद्दा स्वातंत्र्यानंतर मात्र पक्षाला, विशेषत: पंडित नेहरु संकुचित व राष्ट्रीय एकात्मतेला धोकादायक वाटू लागला. मुंबईतील भांडवलदारांना जे मुख्यत: अमहाराष्ट्रीय होते, त्यांचा मुंबई महाराष्ट्राला द्यायला कडाडून विरोध होता.
असा साकारला संयुक्त महाराष्ट्र |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Add